कांदा पिक | एकात्मिक पीक संरक्षण |

 कांदा-लसूण

एकात्मिक पीक संरक्षण 

🧅 हंगामानुसार एखाद्या भागात लागवड एकाच आठवड्यात पूर्ण करावी. दोन हंगामांमध्ये अधिक काळ अंतर राखून रोग, किडींचा जीवनक्रम तोडता येईल. 

🧅 रोपवाटिकेत व शेतात ट्रायकोडर्मा व्हिरीडी एकरी ५०० ग्रॅम हे २०० किलो शेणखतात १५ दिवस आधी मिसळून जमिनीत टाकावे. 

🧅 प्रमाणित बियाणे वापरावे. तसेच बीजप्रक्रिया अवश्य करावी. 

🧅 पिकाची फेरपालट करावी. 

🧅 पाण्याचा चांगला निचरा न होणाऱ्या जमिनीत कांदा लागवड करू नये. 

🧅 रोपे नेहमी गादी वाफ्यांवर लावावीत. 

🧅 रोपांची मुळे पुनर्लागवडीच्या दोन तास अगोदर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम व कार्बोसल्फान २ मि.लि. प्रति लिटर पाणी या द्रावणात बुडवून नंतरच पुनर्लागवड करावी. 

🧅 फवारणी करताना द्रावणात चिकट द्रव्याचा ०.६ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे वापर करावा. 

🧅 कीडनाशके शिफारशीनुसार आलटून पालटून वापरावीत. एकच कीडनाशकसारखे वापरल्यास किडींची प्रतिकारशक्ती वाढते. 

🧅 पर्णीय रोग व कीड नियंत्रणाकरिता, फवारणी (प्रमाण – प्रति लिटर पाणी) 

पुनर्लागवडीच्या ३० दिवसांनंतर - मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक फिप्रोनिल १ मि.लि. 

पुनर्लागवडीच्या ४५ दिवसांनंतर - ट्रायसाक्लॅझोल १ ग्रॅम/ प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. अधिक कार्बोसल्फान २ मि.लि. 

पुनर्लागवडीच्या ६० दिवसांनंतर – हेक्झाकोनॅझोल १ मि.लि./ कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस १ मि.लि.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post