पशु संवर्धन |पावसाळ्यातील नियोजन |

 पशु संवर्धन :- 

हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण ८० ते ८५ टक्के असते. हिरव्या चाऱ्यातून जनावरांना शुष्क पदार्थ कमी प्रमाणात मिळतात. जनावरांचे पोट भरल्यानंतरच ती रवंथ करु लागतात. हिरव्या चाऱ्याचा अधिक प्रमाणात समावेश केल्याने जनावरांचे शेण पातळ पडते. दुधातील घन पदार्थाचे प्रमाण कमी होते. म्हणून हिरव्या चाऱ्याबरोबर आवश्यकतेनुसार कोरडा चाराही सम प्रमाणात द्यावा. पावसाळ्यात वातावरणातील गारवा, थंड हवामानात जनावरांना अधिक उर्जा लागते. अशावेळी जनावरांना अतिरिक्त कोरडा चारा दिल्यास या चाऱ्याचे जनावरांच्या पोटामध्ये ज्वलन होते. या ज्वलनामुळे गाई-म्हशींना त्यांचे शरीर उष्ण ठेवण्यासाठी आवश्यक उर्जा मिळते, त्यामुळे जनावरे वातावरणाशी सहजरीत्या जुळवून घेतात. यासाठी पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहारात कोरड्या चाऱ्याचा समावेश केला पाहिजे. अतिरिक्त उर्जा असणार्‍या मका भरडा, गहू, बाजरीचा भरडा यांसारखा उर्जायुक्त पशुआहार जनावरांच्या आहारामध्ये अर्धा ते एक किलो वाढवावा. बायपास फट १०० ग्रॅम द्यावे, त्यामुळे दूध उत्पादन टिकून राहते.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post