कापूस
मिलिपीड (वाणी/ पैसा) नियंत्रण
⭕️ मशागतीय पद्धत
👉 पेरणीपूर्वी पिकांचे अवशेष व पालापाचोळा गोळा करून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरावेत किंवा नष्ट करून शेत स्वच्छ करावे.
👉 अर्धवट कुजलेले शेणखत शेतात वापरू नये. चांगले कुजलेलेच वापरावे.
👉 पावसाळ्यात बांधावरील गवत नष्ट करून बांध नेहमी स्वच्छ ठेवावेत.
👉 कीड समूहाने राहत असल्याने असे समूह गोळा करून नष्ट करावेत.
👉 रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय असते. त्यामुळे शेतात सायंकाळी ठिकठिकाणी गवताचे छोटे ढीग करून ठेवावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी गवताखाली गोळा झालेल्या किडी वेचून साबणाच्या पाण्यात बुडवून नष्ट कराव्यात.
👉 बांधावरील गवतावरून शेतात मुख्य पिकावर होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेताच्या चोहोबाजूंनी एक मीटर पट्ट्यात राख पसरावी. मोरचूद व कळीचा चुना (२:३) यांच्या मिश्रणाचा पातळ थर राखेवर द्यावा.
⭕️ रासायनिक पद्धत
👉 सरुवातीच्या टप्प्यात प्राथमिक प्रादुर्भाव शेताच्या विशिष्ट भागातून सुरू होतो. हळूहळू पूर्ण शेतात पसरत जातो. त्यामुळे पेरणी केल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस (दोन ते तीन आठवडे) उगवण होऊन रोपे सुस्थितीत येईपर्यंत नियमित सर्वेक्षण करून कीड प्रादुर्भावाचा अंदाज घ्यावा.
👉 क्लोरोपायरिफॉस (२० ईसी) किंवा क्विनॉलफॉस (२० एएफ) २ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे स्थानीय उपचार पद्धतीने फवारणी करावी.
👉 कीड शेतात सर्वदूर पसरलेली असल्यास व अधिक नुकसान होण्याचा धोका असल्यास वरीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची संपूर्ण शेतात फवारणी करावी.
👉 पंपाचे नोझल काढून आळवणी करावी. जेणेकरून रोपांच्या मुळाजवळ रसायन फोचून बुंध्यालगत मातीत असलेल्या किडीचा नायनाट होण्यास मदत होईल.