आडसाली ऊस खत व्यवस्थापन

 आडसाली ऊस

खत व्यवस्थापन 

लागवड करण्यापूर्वी ताग किंवा धैंचा ही हिरवळीची पिके घ्यावीत. हिरवळीचे खत नसल्यास शेवटच्या पाळीअगोदर एकरी १२ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. 

माती परीक्षणानुसार एकरी १६० किलो नत्र, ६८ किलो स्फुरद आणि ६८ किलो पालाशची खतमात्रा द्यावी. यापैकी लागणीवेळी १०% नत्र (१६ किलो नत्र- ३५ किलो युरिया), ५०% स्फुरद (३४ किलो स्फुरद- २१२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ५०% पालाश (३४ किलो पालाश- ५७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. लागणीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी ४०% नत्र (६४ किलो नत्र- १३९ किलो युरिया) द्यावे. लागणीनंतर १२ ते १४ आठवड्यांनी १०% नत्र (१६ किलो नत्र- ३५ किलो युरिया) द्यावे. मोठ्या बांधणीवेळी ४०% नत्र (६४ किलो नत्र- १३९ किलो युरिया), ५०% स्फुरद (३४ किलो स्फुरद- २१२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ५०% पालाश (३४ किलो पालाश- ५७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. को.८६०३२ ही जात रासायनिक खतांच्या वाढीव मात्रेस प्रतिसाद देत असल्यामुळे प्रति एकरी नत्र, स्फुरद व पालाश या रासायनिक खतांची २५% जादा मात्रा द्यावी. 

लोह, जस्त, मॅंगनीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीसाठी एकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मॅंगनीज सल्फेट आणि २ किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये (१०:१ प्रमाणात) ५ ते ६ दिवस मुरवून लागवडीच्या अगोदर सरीतून द्यावे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post