तूर रोपावस्थेतील कीड व रोग नियंत्रण

तूर

रोपावस्थेतील कीड व रोग नियंत्रण 

⭕️ खोडमाशी - पीक रोपावस्थेत असताना खोडमाशीची अळी कोवळे खोड पोखरून आत शिरते. खोडाच्या आतील भागावर उपजीविका करते. त्यामुळे रोपांचा शेंड्याकडील भाग वाळून रोपे मरतात. 

⚔️ नियंत्रण - ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. 

⭕️ मावा – पिले, प्रौढ पानाच्या खालच्या बाजूस राहून किंवा कोवळ्या शेंड्यांवर, फु��ांवर, देठावर आणि शेंगावर राहून त्यातील अन्नरस शोषून घेतात. पाने पिवळी पडतात व त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. कीड चिकट गोड पदार्थ बाहेर टाकते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होऊन प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो. 

⚔️ नियंत्रण - ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. 

⭕️ पाने गुंडाळणारी अळी - अळ्या कोवळ्या देठांवर किंवा पानांच्या घड्या करून आत लपून बसतात, त्यावर उदरनिर्वाह करतात. वाढणारे कोवळे शेंडे, पाने एकमेकांना चिकटल्यामुळे मुख्य खोडाची वाढ खुंटते. 

⚔️नियंत्रण - ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. 

⭕️ पानावरील ठिपके (करपा) - सुरुवातीच्या अवस्थेत पानांवर व शेंगांवर छोटे गर्द तपकिरी रंगाचे ठिपके आढळून येतात. ठिपक्यावर गर्द तपकिरी रंगाचे चट्टे पडतात. ठिपक्यांचा आकार गोल असून त्यामध्ये अर्धवर्तुळाकार रेषा दिसून येतात. या रोगाची तीव्रता जास्त प्रमाणात असल्यास झाडाची सर्व पाने गळून पिकाचे जास्त प्रमाणात नुकसान होते. 

⚔️ नियंत्रण – रोग प्रतिकारक जातींची लागवड करावी. 

कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post