भात पिक खत व्यवस्थापन

 भात

🌾खत व्यवस्थापन 

भात लागवडीसाठी एकरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद व २० किलो पालाश या प्रमाणात रासायनिक खतांच्या मात्रेची शिफारस आहे. हळव्या जातींमध्ये लागवडीवेळी ५० टक्‍के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले ५० टक्‍के नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे. निमगरव्या व गरव्या जातींमध्ये लागवडीवेळी ४० टक्‍के नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी ४० टक्‍के नत्र आणि २० टक्‍के नत्र लागणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावे. 

संकरित जातींकरिता एकरी ४८ किलो नत्र, २० किलो स्फुरद व २० किलो पालाश या प्रमाणात रासायनिक खतांच्या मात्रेची शिफारस आहे. ही खत मात्रा लागवडीवेळी ५० टक्‍के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले २५ टक्‍के नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी आणि उर्वरित २५ टक्‍के नत्र लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post