आले पिकाचे आठवडी नियोजन पाणी व्यवस्थापन

 आले 
पाणी व्यवस्थापन 

आले लागवड जास्त पावसाच्या प्रदेशात जिरायती पद्धतीने केली जाते. तर कमी पावसाच्या प्रदेशात पाणी देऊन केली जाते. सुरवातीच्या काळात या पिकास पाणी देणे गरजेचे असते. कारण मुळांना स्थिरता प्राप्त होण्यासाठी आणि चांगला तग धरून राहण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा असतो. लागवडीनंतर आंबवणीचे पाणी जमिनीच्या मगदुरानुसार तिसऱ्या-चौथ्या दिवशी लगेच द्यावे. पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पावसामध्ये १० ते १२ दिवस खंड पडल्यास या पिकास पाणी द्यावे. हिवाळ्यात १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पीक काढण्याअगोदर १५ दिवस पाणी देण्याचे बंद करावे. पाणी व्यवस्थापनासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन पद्धतींचा प्राधान्याने वापर करावा. यासाठी गादी वाफा पद्धतीने लागवड करावी. एका गादीवाफ्यावर एक ठिबक सिंचनाची नळी टाकून दोन लिटर प्रति तास पाणी देणाऱ्या तोट्या बसवाव्यात. जमिनीच्या मगदुरानुसार ठिबक सिंचन संच सुरवातीस अर्धा ते पाऊण तास सकाळ-संध्याकाळ आणि त्यानंतर एक ते दीड तास चालवावा.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post