खोडवा ऊस
ठिबक सिंचनाची सोय असल्यास, ठिबक सिंचनाची सोय असल्यास, ठिबक सिंचन संचातून ऊसासाठी पाण्याबरोबर शिफारशीत खत मात्रेच्या ८० टक्के विद्राव्य खते (८०:४०:४० नत्र, स्फुरद, पालाश किलो/ एकर) खोडवा ठेवल्यापासून प्रत्येक आठवड्यातून एकदा याप्रमाणे २६ हप्त्यांत दिल्याने ऊस उत्पादनात २८ टक्क्यांनी वाढ होऊन २० टक्के खतांच्या मात्रेत बचत होते.
💧 खोडवा पिकासाठी ठिबक सिंचनातून देण्यासाठी विद्राव्य खतांचे वेळापत्रक (किलो/ एकर/ हप्ता)
आठवडे - युरिया - १२:६१:०० - एम.ओ.पी.
१ ते ४ आठवडे - ०६ - ०२ - १.५
५ ते ९ आठवडे - १० - ०६ - ०२
१० ते २० आठवडे - ६.५ - ४.५ - ०२
२१ ते २६ आठवडे - ०० - ०० - ०४.