भात पिकातील खेकडा नियंत्रण सल्ला

 भात

🦀 बांधावरील खेकड्यांच्या नियंत्रणासाठी सलग दोन ते तीन रात्री बांधावरील खेकडे बत्तीच्या उजेडात पकडून त्यांची संख्या कमी करावी. नंतर विषारी आमिषाचा वापर करून खेकड्यांचे नियंत्रण करावे. 

विषारी आमिष करण्याची पद्धत – एक किलो शिजलेल्या भातामध्ये ॲसिफेट (७५ डब्ल्यूपी) ७५ ग्रॅम मिसळून विषारी आमिष तयार करावे. या मिश्रणाच्या साधारणपणे १०० गोळ्या तयार कराव्यात. प्रत्येक छिद्राच्या आत तोंडाशी एक गोळी ठेवावी व छिद्र बुजवावे. दुसऱ्या दिवशी जी छिद्रे उकरली जातील, त्यात परत आमिष वापरावे. विषारी आमिषाचा वापर सांघिकरीत्या व एकाच वेळी केल्यास खेकड्यांचे नियंत्रण करण्यास मदत होईल.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post