सोयाबीन
पावसाला सुरूवात झाल्यानंतर १५ जून ते १५ जुलैपर्यंत आणि ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करूनच पेरणी करावी. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची व उत्पादनात घट येण्याची शक्यता असते.
सोयाबीनची पेरणी पाभर किंवा ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे ४५ × ५ सें.मी. अंतरावर व ३ ते ४ सें.मी. खोलीवर करावी. पेरणीच्या वेळेस बियाणे जास्त खोल पडल्यास व्यवस्थित उगवण होत नाही. पावसाच्या उशिरा आगमनामुळे पेरणीला उशीर झाल्यास लागवडीसाठी हळव्या जातींची निवड करावी. पेरणीसाठी एकरी २५ टक्के जास्तीचे बियाणे वापरावे. दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. व दोन रोपांतील अंतर ७.५ सें.मी. ठेवावे.