कापूस
बागायती कापूस पिकाची लागवड मे महिन्याच्या शेवटचा आठवडा ते जूनच्या पहिल्या आठवड्यात झाली असेल. मात्र, कोरडवाहू कापूस पिकाची लागवड मॉन्सूनचा तीन-चार इंच पाऊस पडल्यानंतरच करावी. पेरणी योग्य वेळेवर करणे आवश्यक आहे. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. पेरणीस एक आठवडा उशीर झाल्यास उत्पादनात एकरी क्विंटलपर्यंत घट होऊ शकते.
बी.टी. कपाशीमध्ये वाढणाऱ्या बोंडाकडे उपलब्ध अन्नद्रव्यांचे वहन होते. त्यामुळे झाडाची जमिनीस समांतर (आडवी) वाढ कमी होऊन फळफांद्याची लांबी कमी झाल्याचे आढळून आले आहे. बी.टी. कपाशीची लागवड कमी अंतरावर करून एकरी झाडांची संख्या वाढविणे शक्य झाले असले, तरी पेरणीचे अंतर खालीलप्रमाणे योग्य असावे.
🌱 बी.टी. कापूस कोरडवाहू लागवड - १२० x ४५ सें.मी. (४ x १.५ फूट)
🌱 बी.टी. कापूस बागायती लागवड - १५० x ३० सें.मी. (५ x १ फूट) किंवा १८० x ३० सें.मी. (६ x १ फूट)
🌱 सघन लागवड – ९० x ३० सें.मी.