टोमॅटो
🍅पुर्वमशागत व रानबांधणी
जमीन उभी-आडवी खोलवर नांगरून घ्यावी. चांगली कुळवणी करून घ्यावी. त्या वेळी ८ टन प्रति एकरी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. जमिनीत असलेल्या गवताच्या काड्या, हरळीच्या काश्या, लव्हाळा गाठी चांगल्या प्रकारे वेचून जाळून टाकाव्यात. उत्तम प्रतीच्या भारी जमिनीत ९० ते १२० सें.मी. अंतरावर, तर हलक्या जमिनीत ६० ते ७५ सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून जमिनीच्या उतारानुसार वाफे बांधून घ्यावेत. लागण करतेवेळी दोन रोपांतील अंतर ४५ ते ६० सें.मी. ठेवावे. ३.६० x ३.०० मीटर आकारमानाचे वाफे तयार करावेत.