वेलवर्गीय पिके
वेलवर्गीय भाजीपाला पिकांवर मादी फुले आणि नर फुले एकाच वेलीवर परंतु वेगवेगळी (मोनोसीयस) लागतात. मादी फुलांची संख्या जेवढी जास्त तेवढी फळे जास्त प्रमाणात लागतात. त्यामुळे सुरवातीच्या अवस्थेत मादी फुले जास्त लागणे गरजेचे असते. त्यासाठी वेलीवर पुढीलप्रमाणे संजीवके फवारावीत :
पिके दोन पानांची असताना - जिबरेलीक ॲसिड २५ पीपीएम (२५ मिलिग्रॅम प्रति लिटर पाणी)
पिके चार पानांची असताना - नॅप्थील अॅसेटीक ॲसिड १० पीपीएम (१० मिलिग्रॅम प्रति लिटर पाणी)