खरीप कांदा रोपांची पुनर्लागवड

 कांदा-लसूण

🧅 खरीप कांदा रोपांची पुनर्लागवड 


खरिपात रोपे ४० ते ४५ दिवसांत तयार होतात. रोप उपटण्याच्या २ ते ३ दिवस आधी थोड्या प्रमाणात पाणी द्यावे. पानांचा शेंड्याकडील एक तृतीयांश भाग कापून काढावा. काळा करपा, तपकिरी करपा, मर या बुरशीजन्य रोगांचा आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता रोपांची मुळे कार्बेन्डाझीम १ ग्रॅम व कार्बोसल्फॉन २ मि.लि. प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्यामध्ये दोन तास बुडवून नंतरच लागवड करावी. पुनर्लागवडीपूर्वी किंवा पुनर्लागवडीच्या वेळी ऑक्सिफ्लोरफेन (२३.५ ईसी) १.५ मि.लि. किंवा पेंडीमेथॅलीन (३० ईसी) ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात तणनाशकांचा वापर करावा. दोन ओळींमध्ये १५ सें.मी. व दोन रोपांमध्ये १० सें.मी. अंतर ठेवून १२० सें.मी. रुंद, ४० ते ६० मीटर लांब व १५ सें.मी. उंच गादीवाफ्यांवर रोपांची पुनर्लागवाड करावी. पुनर्लागवडीवेळी व त्यानंतर तीन दिवसांनी पाणी द्यावे. त्यानंतर आवश्‍यकतेनुसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post