भात रोपवाटिकेतील एकात्मिक कीड व्यवस्थापन

 भात

रोपवाटिकेतील एकात्मिक कीड व्यवस्थापन 

- भात कापणीनंतर उन्हाळ्यात जमिनीची नांगरट करून धसकटे गोळा करून त्यांचा नाश करावा, यामुळे खोडकिड, लष्करी अळी यांच्या सुप्तावस्थेतील कोषांचा नाश होईल. 

- भात खाचरांचा आकार मर्यादित ठेवून बांधबंदिस्ती करावी व जमीन समपातळीत आणावी. 

- कीड प्रतिकारक वाणांची लागवड करावी. 

- रोपवाटिकेत वाफ्यात बियाणे टाकतेवेळी किंवा पेरणीनंतर १५ दिवसांनी दाणेदार फोरेट (१० सीजी) ४ किलो किंवा क्‍विनॉलफॉस (५ जी) ६ किलो किंवा कार्बोफ्युरान (३ सीजी) ६.५ किलो प्रति एकर प्रमाणात जमिनीत मिसळावे. 

- रोपवाटिकेतील वाफ्यात खोडकिडीचे कामगंध सापळे प्रति एकरी दोन या प्रमाणात लावावेत. - रोपवाटिकेत तुडतुडे, खोडकिड, गादमाशी यांचे प्रादुर्भावानुसार पाच टक्‍के निंबोळी अर्काची फवारणी करावी. 

- भात शेतात निसर्गत: मिरीड, ढेकूण, कोळी इ. विविध परभक्षी कीटक उपलब्ध असतात. त्यांचे संवर्धन करावे. 

- भात लावणीच्या वेळी रोपांचे शेंडे खुडावेत. त्यावरील किडींचे अंडीपुंज, अळ्या गोळा करून त्यांचा नाश करावा.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post