कापूस लागवडीसाठी बीजप्रक्रिया

 कापूस

🌱 बीजप्रक्रिया 

बीटी कापूस बियाण्याला असणारा रंग पाहून शेतकर्‍यांना बीजप्रक्रिया करावी की नाही असा संभ्रम होतो. परंतु बाजारात उपलब्ध असणार्‍या बीटी कापूस बियाण्याला कीटकनाशकाची बीजप्रक्रिया केलेली असते. मात्र बियाण्याद्वारे व मातीमधून पसरणार्‍या रोगांचा प्रतिबंध आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता या दुहेरी उद्देशाने खालीलप्रमाणे बुरशीनाशक व जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी. 

👉थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा सुडोमोनास फ्लूरोसन्स १० ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. यामुळे मर, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. 

👉पिकाच्या वाढीसाठी नत्र स्थिरीकरण करण्यासाठी ॲझेटोबॅक्टर/ ॲझोस्पिरीलम आणि अविद्राव्य स्फुरद विद्राव्य करण्यासाठी स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धनाची २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे गुळाच्या पाण्यात घट्ट द्रावण तयार करून बियाण्यास चोळावे व सावलीत वाळवून लागवडीसाठी वापरावे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post