भात
रोपवाटिकेतील एकात्मिक रोग व्यवस्थापन
- रोगप्रतिकारक जातींचा वापर करावा.
- निरोगी शेतातील रोगमुक्त किंवा प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा. बुरशीनाशक आणि अणुजीवनाशकांची बीजप्रक्रिया करावी.
- रासायनिक खतांचा वापर शिफारशीत मात्रेप्रमाणेच करावा. नत्रयुक्त खते प्रमाणापेक्षा जास्त टाकू नयेत. तसे केल्यास करपा रोगांचे प्रमाण खूपच वाढते.
- करपा आणि पर्ण करपा या दोन्ही रोगांच्या नियंत्रणासाठी, कार्बेन्डाझिम किंवा क्युन्टाल किंवा हेक्झाकोनाझोल १ ग्रॅम/ मि.लि. किंवा इप्रोबेनफ��स २ मि.लि. अधिक स्टिकर (चिकट द्राव) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे. या व्यतिरिक्त करपा (ब्लास्ट) रोगाच्या उत्कृष्ट नियंत्रणासाठी, ट्रायसायक्लाझोल किंवा कासुगामायसीन किंवा एडिफेनफॉस किंवा आयसोप्रोथिओलेन १ ते १.५ ग्रॅम/ मि.लि. अधिक स्टिकर १ मि.लि. प्रति लिटर पाणी यांची फवारणी करावी.