हळद लागवड आठवडी सल्ला

 हळद     

प्रवाही पाणी देण्यासाठी सरी-वरंबा पद्धत, तर यांत्रिकीकरण आणि ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीसाठी गादीवाफ्यावर लागवड करावी. 

सरी-वरंबा पद्धत: ७५-९० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात. सऱ्या पाडण्यापूर्वी एकरी १२ टन कुजलेले शेणखत, ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ७५ किलो पोटॅश जमिनीत मिसळून द्यावे. जमिनीच्या उतारानुसार ६-७ सरी-वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुऱ्याची लांबी ५-६ मीटर ठेवावी. वरंब्याच्या दोन्ही बाजूंस ३० सें.मी. अंतरावर गड्डे कुदळीने आगाऱ्या घेऊन लावावे किंवा वाकुरी पाण्याने भरल्यानंतर गड्डे पाण्यामध्ये वरंब्यात ३ व ५ सें.मी. खोल दाबून घ्यावेत. 

✨ गादीवाफा पद्धत: या पद्धतीत ४-५ फूट अंतर ठेवून सऱ्या पाडाव्यात. वरंबे सपाट करून १ फूट उंचीचे आणि ६० सें.मी. सपाट माथा असलेले गादीवाफे बनवावेत. गादीवाफ्याच्या मध्यभागी लॅटरल अंथरून लॅटरलच्या दोन्ही बाजूंना १५ सें.मी. अंतरावर कंद उभे/ आडवे लावावेत. म्हणजे दोन ओळींमधील अंतर ३० सें.मी. राहते. दोन कंदामधील अंतरही ३० सें.मी. ठेवावे. एकरी साधारणतः २२-२३,००० कंद लागतात. तुषार सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी दोन सऱ्यांमधील अंतर ६ फूट ठेवावे. गादीवाफ्याची उंची १ फूट व रुंदी ४ फूट ठेवावी. दोन्ही बाजूंना १५ सें.मी. अंतर ठेवून दोन ओळींमधील अंतर ३० सें.मी. ठेवावे. एका गादीवाफ्यावर कंदांच्या चार ओळी लावाव्यात. दोन कंदांमध्ये ३० सें.मी. अंतर ठेवावे. लागवडीवेळी कंदाची निमुळती बाजू खाली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. गादीवाफे पूर्ण भिजवूनच लागवड करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post