कांदा-लसूण
🧅 खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन
खरीप कांदा रोपवाटिकेमध्ये पेरणीनंतर २० दिवसांनी खुरपणी करावी. खुरपणीनंतर दोन गुंठे (२०० वर्ग मीटर) क्षेत्रासाठी ८०० ग्रॅम नत्र द्यावे. पाणी देताना ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. प्रत्येक वाफ्यामध्ये ठिबक सिंचनासाठी इनलाइन ड्रीपर असणाऱ्या १६ मि.मी. व्यासाच्या लॅटरलचा वापर करावा. दोन ड्रीपरमधील अंतर ३० ते ५० सें.मी. असावे. त्यांची पाणी बाहेर टाकण्याची क्षमता ताशी ४ लिटर असावी. तुषार सिंचन पद्धतीसाठी दोन लॅटरलमध्ये ६ मीटर इतके अंतर ठेवून, ताशी १३५ लिटर पाणी फेकण्याची क्षमता असलेले नोझल वापरावेत.
⚔️ रोपवाटिकेतील कीड व रोग नियंत्रण
⭕️ फुलकिडे (थ्रीप्स) (फवारणी प्रति लिटर पाणी)
फिप्रोनिल १ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस १ मि.लि. किंवा कार्बोसल्फान २ मि.लि.
⭕️ मर रोग व मातीतून पसरणाऱ्या रोगांसाठी
मेटॅलॅक्झिल + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्रावण करून रोपांच्या ओळीत ओतावे.
⭕️ करपा रोग (फवारणी प्रति लिटर पाणी)
मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल १ मि.लि.
फवारणीवेळी ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे स्टीकर वापरावे.