तूर
🌱 बियाणे प्रमाण
👉 अति हळव्या जाती (कालावधी १३० दिवसांपेक्षा कमी): आयसीपीएल ८७, आयसीपीएल १५१, टीएटी १०, युपीएएस १२०
बियाण्याचे प्रमाण: सलग पेरणी ६.४-७.२ किलो/ एकर
👉 हळव्या जाती (कालावधी १३०-१४५ दिवस): टी विशाखा १, एकेटी ८८११
बियाण्याचे प्रमाण: सलग पेरणी ८ किलो/ एकर, आंतरपीक २ किलो/ एकर
👉 निम गरव्या जाती (कालावधी १६०-१७० दिवस): विपुला, फुले राजेश्वरी, पीकेव्ही तारा, बीएसएमआर ८५३, बीडीएन ७११, गोदावरी, जीआरजी १५२
बियाण्याचे प्रमाण: सलग पेरणी ४.८-६ किलो/ एकर, आंतरपीक १.६-२/ एकर
👉 गरव्या जाती (कालावधी १७० दिवसांपेक्षा जास्त): आशा, बीडीएन ७१६, बीएसएमआर ७३६
बियाण्याचे प्रमाण: सलग पेरणी ४.८-६ किलो/ एकर, आंतरपीक १.६-२ किलो/ एकर
🌱 बीजप्रक्रिया
प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा २ ग्रॅम थायरम अधिक २ ग्रॅम कार्बेन्डाझिम एकत्र करून बीजप्रक्रिया करावी. यानंतर चवळी गटाचे रायझोबिअम व स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धन प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणात मिसळून बीजप्रक्रिया करावी.