संत्रा-मोसंबी-लिंबू
पावसाळ्यामध्ये संत्रा, मोसंबी बागेतील अतिरिक्त पाणी बाहेर काढून देण्यासाठी उताराच्या दिशेने व प्रत्येकी दोन ओळींनंतर ३० सें.मी. खोली, ३० सें.मी. खालची रुंदी व ४५ सें.मी. वरील रुंदी असलेले चर खोदावेत. पाण्याचा निचरा लवकर व प्रभावी होण्यास मदत होईल.
संत्रा, मोसंबी बागेतील ठिंबक सिंचनच्या लॅटरल व्यवस्थित गुंडाळून ठेवाव्यात. पावसाळा सुरू होताच झाडांच्या आळ्यातील आच्छादनासाठी पसरलेले पॉलिथिन शीट काढून घ्यावेत.