कापूस
✨खत व्यवस्थापन
🌱 भरखते- कोरडवाहू कपाशीसाठी २ टन व बागायती कपाशीसाठी ४ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या कुळवणीपूर्वी शेतात मिसळून द्यावे. परिणामी जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
🌱 वरखते– कोरडवाहू बीटी कपाशीसाठी पेरणीसोबत रासायनिक खतांची मात्रा १२:१२:१२ किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति एकर (म्हणजेच २६ किलो युरिया, ७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, १९ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावी. पेरणीनंतर ३० दिवसांनी १२ किलो नत्र प्रति एकर (म्हणजेच २६ किलो युरिया) द्यावा.
बागायती बीटी कपाशीसाठी पेरणीसोबत रासायनिक खताची मात्रा १६:२४:२४ किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति एकर (म्हणजेच ३५ किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ३९ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी १६ किलो नत्र प्रति एकर (म्हणजेच ३५ किलो युरिया) आणि पेरणीनंतर ६० दिवसांनी १६ किलो नत्र प्रति एकर (म्हणजेच ३५ किलो युरिया) द्यावा.
रासायनिक खत मात्रा माती परीक्षणानुसार देणे अधिक योग्य आहे.
माती परीक्षण अहवालानुसार मॅग्नेशिअम, झिंक, बोरॉन यांपैकी ज्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, ते देण्याचे नियोजन करावे. उदा. आवश्यकतेनुसार जमिनीतून द्यावयाचे एकरी प्रमाण: मॅग्नेशिअम सल्फेट ८ किलो, झिंक सल्फेट १० किलो व बोरॉन २ किलो. फुले लागणे व बोंडे पक्व होण्याच्या वेळी मॅग्नेशिअम सल्फेट ०.५ टक्के (५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) प्रमाणे फवारणी करावी.