वेल वर्गीय पिके
सर्वसाधारणपणे कारली, दोडका, घोसाळी, काकडी या पिकांसाठी ताटी पद्धतीचा; तर दुधी भोपळ्यासाठी मंडप पद्धतीचा वापर करावा. पारंपरिक पद्धतीपेक्षा या सुधारित पद्धतीमुळे उत्पादनात वाढ मिळते. दोन ओळींतील अंतर जास्त असल्यामुळे यंत्राच्या साहाय्याने आंतरमशागत करणे सुलभ होते. ताटी अथवा मंडप पद्धतीमुळे भरपूर सूर्यप्रकाश खेळता राहतो, त्यामुळे फळांची प्रत सुधारते. वेलीवर कीटकनाशक अथवा बुरशीनाशकाची फवारणी करणे सुलभ होते. उत्पादनात अंदाजे २० ते २५ टक्के वाढ होते. फळांची तोडणी करणे अतिशय सोईस्कर होते.