केळी
झाडांना आधार
झाडाच्या कक्षेबाहेर लोंबणाऱ्या वजनदार घडामुळे अनेकदा झाड वाकते. वारा आल्यास काहीवेळा मोडून पडते. त्यासाठी आधार देणे आवश्यक असते. झाडाला आधार मिळण्यासाठी लागवड खोल करावी तसेच वेळोवेळी मातीची भर द्यावी. झाडांना आधार दोन प्रकारे दिला जातो.
👉 झाडाला आधार देण्यासाठी बांबूचा वापर केला जातो. यामध्ये दोन बांबूची कैची करून आधार दिला जातो. निलगिरी किंवा सुरू झाडाच्या फांद्या तोडून इंग्रजी ‘वाय’ (Y) आकाराच्या टेकूच्या सहाय्याने झाडांच्या मुखाशी आधार दिला जातो.
👉 झाडाला आधार देण्यासाठी पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या पॉलीप्रॉपीलीन पट्ट्यांचा वापर केला जातो. आधार देताना झाडाच्या गळ्याभोवती पट्टीचे एक टोक सैलसर बांधून दुसरे टोक विरुद्ध दिशेच्या समोरील झाडाच्या बुंध्यालगत बांधण्यात येते. झाडांना आधार देण्याची ही अत्यंत स्वस्त आणि सुलभ पद्धत आहे. या पट्ट्या किमान दोनवेळा वापरता येतात.