संत्रा-मोसंबी-लिंबू
रोपवाटिकेमध्ये माध्यमाचे सौर निर्जंतुकीकरण
रोपवाटिका धारकांनी पन्हेरी उगवण करण्यासाठी १ भाग काळी माती, १ भाग वाळू व १ भाग कुजलेले शेणखत मिश्रण तयार करून घ्यावे. सिमेंट काँक्रिटच्या प्लॅटफॉर्मवर १.५ फूट जाडीचा थर करून मिश्रण पसरावे. ते चांगल्याप्रकारे पाण्याने ओले करावे. यावर १०० मायक्रॉन जाडीचा पारदर्शक अल्ट्रा व्हायोलेट प्रकाश सहनशील पॉलीथिन पेपरने झाकावे. झाकल्यानंतर चारही बाजूने हे पॉलिथिन व मातीने बंद करावे.