कांदा-लसूण
खरीप कांदा
साधारणपणे मे-जून महिन्यात बी पेरून जुलै-ऑगस्ट महिन्यात कांदा रोपांची लागवड करावी. हा कांदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात काढणीस तयार होतो. खरीप हंगामात अधिक उत्पादन घेण्यासाठी शिफारशीत जाती, सुधारित तंत्राचा वापर करावा.
👉 भीमा डार्क रेड
लागवडीनंतर १०० ते ११० दिवसांत काढणी.
सरासरी उत्पादन हेक्टरी २२ ते २४ टन.
साठवणुकीत दोन महिन्यांपर्यंत टिकतो.
👉 भीमा सुपर
लागवडीनंतर १०० ते १०५ दिवसांत काढणी.
सरासरी उत्पादन हेक्टरी २० ते २२ टन.
जास्तीत जास्त कांदे एका डोळ्याचे असतात.
👉 भीमा रेड
लागवडीनंतर १०५ ते ११० दिवसांत क���ढणी.
सरासरी उत्पादन हेक्टरी १९ ते २१ टन.
👉 भीमा राज
लागवडीनंतर १०० ते १०५ दिवसांत काढणी.
सरासरी उत्पादन हेक्टरी २४ ते २६ टन.
👉 एन ५३
कांदे गोलाकार, परंतु थोडे चपटे असतात.
कांद्याचा रंग जांभळट लाल आणि चवीला तिखट.
👉 बसवंत ७८०
कांदे गोलाकार आणि शेंड्याकडे थोडे निमुळते असतात.
रंग आकर्षक लाल असून डेंगळे आणि जोड कांदे यांचे प्रमाण कमी.
लागवडीपासून १०० ते ११० दिवसांत काढणी.
सरासरी उत्पादन हेक्टरी २५ टन.
👉 फुले समर्थ
खरीप व रांगडा हंगामात लागवडीसाठी शिफारस.
कांद्याचा रंग गडद लाल, आकाराने गोलाकार आणि पातळ मान.
लागवडीनंतर ९० दिवसांनी काढणी.
उत्पादन हेक्टरी २० ते २५ टन.