सूर्यफूल
सूर्यफूल बियांत साधारणतः ३५ ते ४५ टक्के तेलाचे प्रमाण असते. तेलामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्ध पदार्थ, प्रथिने, खनिज पदार्थ, जीवनसत्व ‘अ’ आणि ‘ई’ असते. तेलामध्ये ६८ टक्के लिनोलिक आम्ल, तर २० ते ४० टक्के ओलिक आम्ल असते. तेल काढण्याची प्रक्रिया करण्यापूर्वी बियांमधील फोलपट काढून टाकणारे यंत्र म्हैसूरच्या अन्न तंत्रविज्ञान संस्थेने तयार केले आहे.
उप उत्पादन म्हणून मिळणाऱ्या सूर्यफूल पेंडीचा उपयोग मानवी खाद्य मिश्रणासाठी करता येतो. तसेच पेंडीचे पीठ तयार करता येऊ शकते. पेंडीमध्ये ४० टक्के प्रथिने आहारदृष्ट्या इतर प्रथिनांच्या तोडीची आहेत. सूर्यफूल पेंडीत कोणतेही अपायकारक घटक नाहीत. म्हणून याचा वापर मुख्यत्वे गाय, शेळी, मेंढी इत्यादी रवंथ करणाऱ्या जनावरांच्या आहारात करतात.