कापूस
कापसाचा हंगाम वेळेत (डिसेंबर अखेरपर्यंत) संपवणे, फरदड न घेणे आणि एप्रिल - मे महिन्यातील पूर्वहंगामी लागवड न करणे या बरोबरच शिफारशीत म्हणजेच जून महिन्यात लागवड या बाबी गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी महत्त्वाच्या आहेत. कमी कालावधीत व एकाच वेळेत परिपक्व होणाऱ्या (१५०-१६० दिवस) वाणांची निवड करावी. सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास पूर्वहंगामी कपाशीऐवजी उन्हाळी हंगामातील पर्यायी पिके घ्यावीत. पिकांतील फेरपालटामुळे किडीचा जीवनक्रम खंडित होण्यास मदत होईल. बेवड मिळेल अशा पिकांमुळे जमिनीची सुपीकताही टिकून राहील.