टोमॅटो
टोमॅटो पिकाची फुलगळ प्रामुख्याने जास्त तापमान, जास्त आर्द्रता, मंद प्रकाश, वेगवान व कोरडे वारे, पाण्याचा ताण, रोग व किडींचा प्रादुर्भाव तसेच पिकांमधील वाढ संप्रेरकांत होणारे अवांच्छित बदल इत्यादी कारणांमुळे होते. टोमॅटोची फुलगळ टाळण्यासाठी वरील सर्व बाबींचे योग्य व्यवस्थापन व नियंत्रण करणे गरजेचे आहे. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार एन.ए.ए. या वाढ संप्रेरकाच्या २० पीपीएम द्रावणाची फक्त फुलोऱ्यावर फवारणी करावी.