कोबी वर्गीय पिके
ब्राउन रॉट (गड्डा कुजणे)
ही विकृती फ्लॉवर आणि ब्रोकोलीवर आढळून येते. बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे ही विकृती आढळून येते. खोड व गड्ड्यावर भुरकट डाग दिसतात आणि त्यातून पाणी बाहेर येते. गड्ड्याचा दांडा पोकळ, काळपट पडून कुजू लागतो. संपूर्ण गड्ड्यावर भुरकट काळे, कुजकट डाग दिसतात. वालुकामय जमिनीत ही विकृती अधिक प्रमाणात होते.
🛡️ उपाययोजना
👉जमिनीत बोरॅक्स पावडर एकरी ८ किलो या प्रमाणात मिसळून द्यावी.
👉लागवडीनंतर ३० दिवसांनी बोरॅक्स पावडर ४०० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यातून पिकावर फवारणी करावी.
👉शतात सेंद्रिय खतांचा एकरी ८ ते १० टन वापर करावा.
👉एकच पीक वारंवार न घेता पिकांची फेरपालट करावी.