आले
आले जाती
हवामानाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या जातींची लागवड केली जाते. त्या त्या भागानुसार जातींना नावे दिली आहेत. जसे सातारा परिसरातील माहीम, औरंगाबाद परिसरातील औरंगाबादी, कालिकत, कोचीन, मारन इत्यादी जातींचा समावेश होतो; तर काही जाती बाहेरच्या देशांतून आयात केलेल्या आहेत. त्यामध्ये रिओ डी जानेरो, चायना, जमैका या जातींचा समावेश होतो.
माहीम : महाराष्ट्रामध्ये प्रचलित जात, कालावधी २१० दिवस, मध्यम उंचीची सरळ वाढणारी जात, ६ ते १२ फुटवे, सुंठेचे प्रमाण १८.७ टक्के, उत्पादन प्रतिहेक्टरी २० टन.
राष्ट्रीय स्तरावर भारतीय मसाल्याचे पीक संशोधन केंद्र, कालिकत यांनी प्रसारीत केलेल्या काही जाती
वरदा - कालावधी २०० दिवस, हेक्टरी उत्पादन २२.३ टन, तंतूचे प्रमाण ३.२९ ते ४.५० टक्के, फुटव्यांची संख्या ९ ते १०, सुंठेचे प्रमाण २०.०७ टक्के.
महिमा - कालावधी २०० दिवस, हेक्टरी उत्पादन २३.२ टन, तंतूचे प्रमाण ३.२६ टक्के, फुटव्यांची संख्या १२ ते १३, सुंठेचे प्रमाण १९ टक्के, सूत्रकृमीस प्रतिकारक जात.
रिजाथा - कालावधी २०० दिवस, हेक्टरी उत्पादन २२.४ टन, तंतूचे प्रमाण ४ टक्के, सुगंधी द्रव्याचे प्रमाण २.३६ टक्के, फुटव्यांची संख्या ८ ते ९, सुंठेचे प्रमाण २३ टक्के, प्रामुख्याने सुंठ बनविण्यासाठी प्रसारीत जात.