सुर्यफुल काढणी सल्ला

 सुर्यफुल

⭐️ बुंधा, पाने, फुलांच्या भुशाचा उपयोग - 

सूर्यफूल झाडापासून मूरघास तयार करता येते. हा मूरघास जनावरे अत्यंत चवीने खातात.
वाळलेली बोंडे व झाडे जनावरे चवीने खातात.
झाडाचा बुंधा, पाने, फुलांच्या भुश्‍श्‍यापासून कंपोस्ट खत तयार करून पिकांना दिले तर नत्र, स्फुरद, पालाश इत्यादी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. जमिनीचा पोत सुधारतो. 

झाडाचा बुंधा, पानांच्या लगद्यापासून कागद तयार करतात. 

बुंध्यातील गराचा उपयोग पार्सलचे खोके, शोभेचे छप्पर, बाटलीची बुचे इत्यादी उपयुक्त वस्तू बनविण्यासाठी केला जातो. 

फुलांचा भुसा पशू व पक्ष्यांसाठी खाद्य म्हणून वापरतात. 

खोड व भुशापासून मिळणाऱ्या पेक्‍टिनमध्ये मिथॉक्‍सीलचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याला फळांपासून मिळणाऱ्या  पेक्‍टिनपेक्षा जास्त मागणी असते. 

⭐️ इतर उपयोग - 

औषधी वनस्पती म्हणून उपयोग 

गराचा उपयोग बेंड, पुळीवर लेप देण्यासाठी करतात. 

अंग मॉलिशसाठी सूर्यफूल तेलाचा वापर होतो. 

सूर्यफुलामधील रसामुळे उंदरांना विषबाधा होते. त्यामुळे उंदीर नियंत्रणाकरिता याचा वापर होतो. 

मधमाशी पालनासाठी उपयुक्त 

तेलाचा उपयोग रंग, वॉर्निश, प्लॅस्टिक वस्तू निर्मितीमध्ये होतो. 

डिझेलबरोबर योग्य प्रमाणात सूर्यफुलातील अल्कोहोल व फरफ्युरलचे मिश्रण करून इंधन म्हणून उपयुक्तता तपासली जात आहे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post