भात
रोपवाटीका व्यवस्थापन
पुनर्लागवड पद्धतीमध्ये उत्पादन कमी येण्याच्या कारणामध्ये रोपवाटिका व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष हे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे योग्य रोपवाटिका व्यवस्थापन हे फायदेशीर भात शेतीचे मूळ आहे. खरीप हंगामासाठी भाताची पेरणी १५ मे ते २५ जूनपर्यंत गादीवाफ्यावर करावी. पेरणीकरिता १ ते १.२० मीटर रुंद व ८ ते १० सें.मी. उंच आणि आवश्यकतेनुसार लांबीचे गादी वाफे तयार करावेत. एक एकर क्षेत्रावरील लागवडीसाठी ४ गुंठे रोपवाटिका पुरेशी होते. १ गुंठा वाफ्यास २५० किलो शेणखत किंवा कंपोष्ट खत आणि १ किलो युरीया खत मातीत मिसळावे. पेरणी ओळीत व विरळ करावी. रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रति गुंठा १ किलो युरीया खत द्यावे. पावसाच्या अभावी व इतर कारणाने लागवड लांबणीवर पडल्यास प्रति गुंठा क्षेत्रातील रोपास १ किलो युरीयाचा तिसरा हप्ता द्यावा. योग्य पाणी व्यवस्थापन करावे. क��ड व रोग नियंत्रणाकडे लक्ष द्यावे.