कापूस
पिकांची फेरपालट
पीकपद्धतीच्या प्रकारानुसार (निखळपीक, मिश्रपीक, आंतरपीक) अवलंबून असते. कोरडवाहू शेतीमध्ये सोयाबीन, ज्वारी, मूग किंवा उडीद या पिकानंतर पुढील वर्षी कापूस अशी फेरपालट करावी. बी.टी. कापसाची वेचणी लवकर येत असल्यामुळे बी.टी. कपाशीनंतर पुढील हंगामात गहू, उन्हाळी भुईमूग अशी पीकपद्धती फायदेशीर आहे.