केळी पिक सल्ला | वारारोधक कुंपण |

केळी

वारारोधक कुंपण 

उन्हाळ्यात केळी बागेच्या व्यवस्थापनामध्ये वारारोधक कुंपणाचे खूप महत्त्व आहे. लागवडीच्या वेळी बागेच्या भोवती चारही बाजूंनी वारारोधक सजीव कुंपण करणे आवश्यक आहे. यासाठी केळी बागेच्या बाहेरील बाजूच्या ओळीपासून २ मीटर अंतर सोडून शेवरी, गजराज गवत, बांबू या झपाट्याने वाढणाऱ्या वारारोधक पिकांची दोन ओळींत दाट लागवड केळी लागवडीनंतर लगेच करावी. उन्हाळ्यापर्यंत या सजीव कुंपणाची वाढ पूर्ण होते. ही कुंपणे उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्णलाटेपासून तसेच वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यापासून बागेचे संरक्षण करतात. त्यामुळे केळीच्या बागेत सुसह्य तापमान, आर्द्रता टिकून राहते. बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. वाऱ्याला अटकाव घातला गेल्याने पाने कमी प्रमाणात फाटतात. घड सटकण्याच्या आणि झाडे उन्मळून पडण्याच्या प्रमाणात घट येते. अधिक खर्च करायची क्षमता असल्यास बागेभोवती शेडनेटचे वारारोधक कुंपण उभे केल्यास त्वरित चांगले परिणाम मिळतात.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post