शेळी पालन :-
उष्माघात हा शेळ्या, करडांना प्राणघातक ठरू शकतो. म्हणून उष्माघात लवकरात लवकर ओळखून त्यांच्यावर उपचार करणे हितकारक ठरते. शेळ्यांवर जास्त तापमानाचा परिणाम झाल्यास, शेळ्या जास्त प्रमाणात श्वासोच्छवास करतात. जास्त लाळ गाळतात. त्यांना उभे राहण्याची ताकद राहत नाही. त्यांना जास्त थकवा जाणवतो. खाद्य कमी खाणे, अशी लक्षणे असतील तर उष्माघाताची शक्यता असते.
शेळ्यांना थंड व हवेशीर ठिकाणी ठेवावे. थंड पाणी पाजावे व गरज भासल्यास पायावर, मानेवर, पाठीवर पाणी शिंपडावे. पाण्याचा फवारा व शक्य असल्यास पंखे लावून गोठ्यातील वातावरण थंड करावे. शेळ्यांची दाटीवाटी किंवा गर्दी कमी करावी. तज्ज्ञांकडून औषधोपचार करून घ्यावेत. खाद्यातून शेळ्यांना क्षार मिश्रण, जीवनसत्त्वे द्यावीत. लहान करडांची उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी. कारण करडांची उष्माघातामुळे जास्त प्रमाणात मरतूक होते.