आले
हवामान
महाराष्ट्रामध्ये आले पिकाची लागवड कोकणापासून ते विदर्भ, मराठवाड्यापर्यंत उत्तम प्रकारे करता येऊ शकते. आले पिकाला उष्ण व दमट हवामान मानवते. परंतु, ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी उष्ण व कोरड्या हवामानातही या पिकाची लागवड करता येते. आल्याच्या उगवणीसाठी ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमान, तर वाढीच्या कालावधीत २० अंश ते ३० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. या पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत सरासरी १५० ते ३८० सें.मी. पाऊस पुरेसा ठरतो. परंतु, जास्त पावसाच्या प्रदेशात पाण्याचा उत्तम निचरा होणे आवश्यक आहे. साधारणतः २५ टक्के सावलीच्या ठिकाणी पीक चांगले येते.