वेल वर्गीय पिके |कवडी, डिंक्या रोग नियंत्रण |

 वेल वर्गीय पिके

रोग नियंत्रण 

⭕️ कवडी (ॲन्थ्रॅक्नोज) 

🌱 पिके: मुख्यतः काकडी, कलिंगड, खरबूज, दुधी भोपळा, कारली 


🔬 रोगकारक बुरशी: कोलिटोट्रीकम लाजेनॅरियम (पूर्णावस्था- ग्लोमेरेल्ला सिन्गुलाटा) 

🤔 लक्षणे: पानावर पानथळ, लहान, पिवळसर आणि नंतर तपकिरी ठिपके पडतात. रोगग्रस्त पाने करपतात. पानांचे देठ आणि वेलीवर रोगाचे ठिपके पडून पाने व वेली सुकून वाळतात. 

⚔️ उपाययोजना 

👉पिकाची फेरपालट करावी. 

👉रोगविरहित फळांचे बी वापरावे. 

👉जमीन उत्तम निचरा होणारी असावी. 

👉पिकाची लागवड मंडप अथवा ताटी पद्धतीने करावी. 

👉रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने, फळे काढून नष्ट करावी. 

👉पीक संपल्यानंतर वेली काढून नष्ट कराव्यात. 

👉बीजप्रक्रिया- कार्बेन्डाझिम २.५-५ ग्रॅम प्रतिकिलो 

👉रोगाची लक्षणे दिसताच किंवा लागवडीनंतर ४५ दिवसांनी, (फवारणी प्रतिलिटर पाणी) 

मँकोझेब/ क्लोरोथॅलोनील/ कॅप्टन २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम 

पुढील फवारणी आवश्यकतेनुसार बुरशीनाशक बदलून घ्यावी. 

⭕️ डिंक्या 

🌱 पिके: दुधी भोपळा, खरबूज, घोसाळी, काकडी 

🔬रोगकारक बुरशी: डायडीमेला ब्रायोनिआ 

🤔 लक्षणे: वेलीच्या कांड्याच्या भागात पिवळसर तपकिरी रंगाचा डिंकासारखा द्रव पाझरतो, नंतर तो काळ्या रंगाचा होतो. खोड आणि फळांवर चिरा पडतात, त्यामुळे वेल वाळतो. फळे सडतात. संकरित वाणावर रोगाचे प्रमाण जास्त आढळून येते. 

⚔️ उपाययोजना 

👉 पिकाची फेरपालट करावी. 

👉 रोगविरहित फळाचे बी वापरावे. 

👉 खोल नांगरट करून पिकांचे अवशेष पीक संपल्यानंतर नष्ट करावेत. 

👉 जमिनीत हिरवळीचे खत आणि ट्रायकोडर्माचा उपयोग करावा. 

👉 बीजप्रक्रिया- कार्बेन्डॅझिम ३-५ ग्रॅम प्रतिकिलो 

👉 रोगाची लक्षणे दिसताच, (फवारणी प्रतिलिटर पाणी) 

कार्बेन्डाझिम/ थायोफेनेट मिथाईल १ ग्रॅम 

पुढील फवारणी आवश्यकतेनुसार बुरशीनाशक बदलून करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post