खोडवा ऊस
पाणी कमतरतेच्या परिस्थितीत खोडवा पीक व्यवस्थापन
👉पाचट जाळलेले असल्यास हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून घ्यावे. याचा आच्छादन म्हणून वापर करावा. ऊस तुटल्यावर एक महिन्यांनी हिरवळीच्या पिकाची टोकण पध्दतीने लागवड करुन पीक दीड महिन्याचे झाल्यावर आच्छादनासाठी वापर करावा.
👉पाचट आच्छादन न केलेल्या शेतकऱ्यांनी एक आड एक सरी पाण्याचे नियोजन करावे आणि पुढच्या पाण्याच्या वेळी सरी बदलावी.
👉पाणी उपलब्ध असल्यास खतांचा पहिला व दुसरा हप्ता देऊन पाणी द्यावे. एकाच वेळी पाणी देणे शक्य असल्यास फक्त खतांचा पहिला हप्ता देऊनच पाणी द्यावे.
👉पाणी उपलब्ध नसल्यास रासायनिक खते जमिनीत देऊ नयेत, खते फवारणीद्वारे द्यावीत. बगला फोडू नयेत.
👉पावसाळा सुरू झाल्यावर खताचा शेवटचा हप्ता देऊन पाणी द्यावे.
👉उसाच्या शेताभोवती दाट शेवरीची लागवड असल्यास गरम हवेचा झोत अडविला जाऊन उसाच्या पानातील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन पीक वाळत नाही.