पूर्वहंगामी ऊस आठवडी नियोजन

 पूर्वहंगामी ऊस

ऊस हे उष्ण कटिबंधातील पीक असल्यामुळे त्यास उष्ण हवामान, २० ते ३० सेल्सियस तापमान, ८०-९० टक्के आर्द्रता, प्रखर सूर्यप्रकाश, पुरेसे पाणी पोषक असते. तथापि कडक उन्हाळा, तसेच पाण्याची कमी उपलब्धता याचा पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. आपत्कालीन परिस्थितीत उसावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना: 

👉 को ८६०३२ व कोएम ०२६५ हे वाण अन्य जातींपेक्षा पाण्याचा ताण सहन करतात. त्यांना प्राधान्य द्यावे. 

👉 पाणी उपलब्धता कमी असल्यास, एक आड एक सरीतून पाणी द्यावे. 

👉 पाण्याचा ताण पडत असल्यास, उभ्या उसाची खालील पक्व तसेच वाळलेली पाने काढून सरीत आच्छादन करावे. 

👉 ताण अवस्थेत लागणीनंतर ६०, १२० आणि १८० दिवसांनी २ टक्के म्युरेट ऑफ पोटॅश व २ टक्के युरिया यांचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी. 

👉 बाष्पीभवन कमी करण्यासाठी ६ ते ८ टक्के केओलीन या बाष्परोधकाची फवारणी करावी. 

👉 ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. 

👉 ऊस पीक हे तणविरहीत ठेवावे. 

👉 शेताच्या सभोवती उंच जलद वाढणारी शेवरीसारखी पिके लावावीत. 

👉 एकरी २ ते २.५ टन पाचटाचे आच्छादन करावे. प्रतिटन पाचटासाठी ८ किलो युरिया, १० किलो सुपर फॉस्फेट व १ किलो पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post