बाजरी
बाजरी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख अन्नधान्य पीक आहे. त्याचा आहारात वापर खूप वर्षांपासून आपले पूर्वज करीत आहेत. बाजरीत असलेल्या पोषण तत्वांमुळे त्याचे आहारातील महत्व अनन्य साधारण आहे. इतर तृणधान्यांपेक्षा बाजरी हे पीक सर्वात जास्त उर्जा (३६० किलो कॅलरी प्रति १०० ग्रॅम) देते. शिवाय प्रथिनांचे प्रमाण १२ ग्रॅम, स्निग्ध पदार्थ ५ ग्रॅम, पिष्टमय पदार्थ ६७ ग्रॅम, फॉस्फरस २४२ मि.ग्रॅम, कॅल्शियम ४२ मि.ग्रॅम, लोह सरासरी ६० पीपीएम, जास्त सरासरी ३० पीपीएम, मॅग्नेशियम २८ ग्रॅम, व्हिटामिन बी-६ २० टक्के इतक्या प्रमाणात असते. त्यामुळे अलीकडे आहारतज्ञ व पोषणतज्ञ बाजरीचा अंतर्भाव आहारात करण्याविषयी सल्ला देतात.