आंबिया बहरातील फळगळीवर उपाययोजना

 संत्रा-मोसंबी-लिंबू


आंबिया बहरातील फळगळीवर उपाययोजना 

👉नियमित ठिबक सिंचन वेळापत्रकाप्रमाणे सध्या एप्रिल महिन्यात १०० ते १२० लिटर पाणी/ दिवस/ झाड पाणी द्यावे. पुढे मे महिन्यात १६० ते १८० लिटर पाणी/ दिवस/ झाड ठिबक सिंचनाद्वारे द्यावे. 

👉आळे पद्धतीने पाणी देत असल्यास ३ ते ४ दिवसांच्या अंतराने दुहेरी आळे पद्धतीने मातीच्या मगदुराप्रमाणे पाणी (कमी प्रमाणात पण जास्तवेळा विभागून) द्यावे. 

👉पलॅस्‍टिक किंवा गवताने आळ्यामध्ये आच्छादन करावे. 

👉फळगळीच्या नियंत्रणासाठी २,४-डी (१५ पीपीएम) १.५ ग्रॅम अधिक युरिया किंवा पोटॅशिअम नायट्रेट २ किलो प्रति १०० लिटर पाणी किंवा पुढे १५ दिवसाच्या अंतराने जीए-३ (१५ पीपीएम) १.५ ग्रॅम अधिक पोटॅशिअम नायट्रेट २ किलो प्रति १२० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post