केळी बाग आठवडी नियोजन | घड व्यवस्थापन |

 केळी


केळीची निसवण सुरू झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांत घडातील सर्व फण्या केळ कमळातून बाहेर येतात. शेवटची फणी बाहेर आल्यानंतर दोन ते तीन दिवसांत खाली उमलणारे केळफूल धारदार विळ्याच्या सहाय्याने कापून घ्यावे. कापलेली केळफुले बागेत इतरत्र न टाकता कंपोस्ट खड्ड्यात टाकावीत. केळीला सरासरी १० ते १२ पेक्षा जास्त फण्या येतात. दर्जेदार उत्पादनासाठी घडावर ८ ते १० फण्या ठेवून अतिरिक्त फण्यांची विरळणी करावी. घडात राखावयाच्या फण्या ठरवून त्या लगतच्या खालच्या फणीत एक केळी ठेवून उर्वरित खालील फण्या कापून टाकाव्यात. घडाच्या फण्यात आलेली वेडीवाकडी फळे, जोड फळे चाकूच्या सहाय्याने कापावीत. घड पूर्ण निसवल्यानंतर व विरळणीनंतर घडावर पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट ५ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावणाची एकत्रित फवारणी करावी. १०० गेज जाड, ७५ x १०० सें.मी. आकाराच्या २-६ टक्के सच्छिद्रता असलेल्या प्लॅस्टिक पिशवीने घड झाकावा. पिशवी बांधताना दांड्यांचा अधिकाधिक भाग झाकून पिशवीचे खालील तोंड मोकळे सोडावे. घड वाढीच्या अवस्थेत घडांतील फळांना घासून इजा करणारी घडाशेजारील पाने व रोगट पाने वेळीच कापून नष्ट करावीत.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post