हळद पिकासाठी आवश्यक हवामान

 हळद     
हवामान 

हळदीच्या पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व चांगल्या प्रकारच्या जमिनीत या पिकाची वाढ उत्तम होते. पाण्याचा ताण अगर जास्त पाऊसमान हे पीक काही काळ सहन करू शकते; परंतु जास्त वेळ पाणी साचून राहणे, या पिकास हानिकारक आहे. पिक लागवडीसाठी मे ते जून महिन्यातील उष्ण व दमट हवामान अनुकूल असते. हळदीच्या वाढीसाठी उष्ण, दमट आणि हिवाळ्यातील थंड हवामान उपयुक्त ठरते. पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची, फुटव्यांची वाढ भरपूर होते. थंडीमुळे हळदीची पालेवाढ काही अंशी थांबते. जमिनीत कंदाची (फण्यांची वाढ) वाढ होते. कोरडी व थंड हवा कंद पोसण्यास अनुकूल असते. हळदीची लागवड जेथे कायमस्वरूपी सातत्याने केली जात नाही, तेथे कंदमाशीसारख्या किडीचा उपद्रव नगण्य असतो. ज्या भागामध्ये उसाचे क्षेत्र जास्त आहे, तेथे हवेतील दमटपणा थोडा वाढतो. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post