संत्रा-मोसंबी-लिंबू पिकातील कीड व्यवस्थापन

 संत्रा-मोसंबी-लिंबू

कीड व्यवस्थापन 

⭕️ खोड किडा - दुर्लक्षित आणि अस्वच्छ बागेत या झाडाची साल खाणाऱ्या अळीचा उपद्रव अधिक दिसून येतो. अळी दोन फांद्यांच्या सांध्यात छिद्र करते, ज्यात ती दिवसभर आराम करते. रात्री बाहेर पडून बुंध्याची व फांद्याची साल खाते. कीडग्रस्त फांद्या व झाडांचे आयुष्य आणि उत्पादन क्षमतेत घट होते. 

सर्वप्रथम कीडग्रस्त भागावरील जाळे काढून अळीच्या छिद्राजवळील भाग साफ करावा. नंतर क्लोरपायरीफॉस (२० ईसी) १० मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावण पिचकारीच्या साहाय्याने छिद्रात टाकावे. नंतर छिद्र कापसाच्या बोळ्याने बंद करावे. 

⭕️कोळी - संत्र्यावरील कोळी पानातील आणि आंबिया बहाराच्या लहान फळातील रस शोषून घेतात. पानांचा पृष्ठभाग राख किंवा धूळ साचल्याप्रमाणे धूळकट दिसतो. पानांच्या वरील भागाला फिकट गोलाकार चट्टे पडतात. पानाच्या खालील भागावर असे चट्टे आढळत नाहीत. त्याचप्रमाणे फळांवर मोठे, चंदेरी वा करड्या रंगाचे चट्टे पडतात. 

कोळी नियंत्रणासाठी, डायकोफॉल (१८.५ ईसी) २ मि.लि. किंवा सल्फर (८० डब्ल्यूडीजी) ३ ग्रॅम किंवा प्रोपरगाईट (५७ ईसी) १ मि.ली. किंवा ईथिऑन (५० ईसी) २ मि.ली. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी १५ दिवसांनंतर आवश्यकतेनुसार करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post