खोडवा ऊस
खत व्यवस्थापन
खोडव्याला पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वापसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली मात्रा द्यावी. रासायनिक खतांची मात्रा पहारीसारख्या अवजाराच्या सहाय्याने जमिनीत वाफसा असताना, दोन समान हप्त्यात द्यावी. पहिली खतमात्रा खोडवा ठेवल्यानंतर १५ दिवसांचे आत पूर्ण करावी. पहारीने बुडख्यांपासून १० ते १५ सें.मी. अंतरावर, १५ ते २० सें.मी. खोल छिद्र घेवून सरीच्या एका बाजूला पहिली खतमात्रा द्यावी. दोन छिद्रांमधील अंतर ३० सें.मी. ठेवावे. दुसरी खतमात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने १२०-१३५ दिवसांनी द्यावी आणि नेहमीप्रमाणे पाणी द्यावे.
🎋 खोडवा उसासाठी पहारीने द्यावयाची खतमात्रा (प्रति एकर)
खतांचा प्रकार पहिली मात्रा दुसरी मात्रा
१. युरिया १२५ किलो १२५ किलो
सिंगल सुपर फॉस्फेट १७५ किलो १७५ किलो
म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो ५० किलो
किंवा
२. युरिया १५० किलो १५० किलो
डी.ए.पी. ७५ किलो ७५ किलो
म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो ५० किलो
सल्फर १२ किलो १२किलो
किंवा
३. युरिया १०० किलो १०० किलो
१०:२६:२६ १७५ किलो १७५ किलो
सल्फर १२ किलो १२ किलो
किंवा
४. युरिया १०० किलो १०० किलो
१२:३२:१६ १०० किलो १०० किलो
म्युरेट ऑफ पोटॅश २५ किलो २५ किलो
सल्फर १२ किलो १२ किलो