पूर्वहंगामी ऊस
कीड नियंत्रण
⭕️ कांडी कीड - प्रादुर्भाव कांडी तयार झाल्यापासून ऊस तोडणीपर्यंत दिसतो. भरपूर तापमान, कमी आर्द्रता आणि कमी पाऊस यांमुळे कांडी किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. वाढ कमी होते, कांड्या लहान होतात, पांगश्या फुटतात. पाचट काढले असता अळी दिसून येते.
🛡️ व्यवस्थापन
→ कीडविरहीत बेण्याची लागवड करावी.
→ जास्त प्रादुर्भाव असलेल्या शेतात ५, ७ व ९ महिन्यांनी वरील हिरवी पाने ठेवून खालच्या बाजूची पाने काढून टाकावीत.
→ जास्त नत्रयुक्त खते टाळावीत.
→ पाणथळ ठिकाणी पाण्याचा योग्य निचरा करावा.
→ लागवडीनंतर ४ महिन्यांनंतर १५ दिवसांच्या अंतराने प्रति एकरी २ ट्रायकोकार्ड वापरावीत.
→ एकरी २ कामगंध सापळे (आय.एन.बी. ल्यूर) लावावेत.
→ प्रति एकरी क्विनॉलफॉस (५ जीआर) दाणेदार १२ किलो किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (०.४ जीआर) दाणेदार ७.५ किलो याप्रमाणे जमिनीत मिसळावे.