खोडवा उसातील पाणी व्यवस्थापन

खोडवा ऊस
पाणी व्यवस्थापन 

पारंपरिक पद्धतीने खोडवा व्यवस्थापनामध्ये पाण्याच्या २६ ते २८ पाळ्या लागतात. परंतु संवर्धित ऊस खोडवा व्यवस्थापन पद्धतीमध्ये फक्त १२ ते १४ पाण्याच्या पाळ्या असल्या तरी खोडवा उसाचे चांगले उत्पादन मिळते. दोन पाळ्यांतील अंतर नेहमीच्या पद्धतीपेक्षा दीड पटीने वाढवावे. पाचटाच्या आच्छादनामुळे पीक पाण्याचा ताण सहन करू शकते. बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. त्यामुळे ही पद्धत ज्या भागात पाण्याचा जास्त तुटवडा आहे, त्या भागासाठी उपयुक्त आहे. 

💧 ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब: लांब-रुंद सरी किंवा जोड ओळ लागवड पद्धतीच्या खोडवा पिकामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करावा. मुळांच्या कक्षेत पाणी, हवा यांचे प्रमाण साधून पीक वाढीच्या अवस्थेनुसार खत व पाणी व्यवस्थापन केल्याने उत्पादनात वाढ होते. पाण्यात विरघळणारी खते (युरिया, फॉस्फोरिक अ‍ॅसिड आणि पांढरा पोटॅश) मुळांच्या सहवासात दिल्याने खतांच्या मात्रेत ३० ते ४० टक्के बचत होते. खोडवा पिकात वाफसा राखल्याने गांडूळे आणि उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते. पाचट लवकर कुजून जमिनीची जैविक, रासायनिक व भौतिक उपयुक्तता वाढते. खोडवा पिकामध्ये पाचट आच्छादन, ठिबक सिंचनाच्या वापरामुळे ४५ ते ५० टक्के पाण्याची बचत होते. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी व खताचा काटेकोर वापर करून खोडवा पिकाचे लागवडीच्या उसाइतके किंवा त्यापेक्षा अधिक उत्पादन घेणे शक्य आहे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post