भुईमुग
सूक्ष्म अन्नद्रव्ये
भुईमूग पिकामध्ये प्रामुख्याने लोह, जस्त आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते.
👉लोह - ज्या जमिनीत लोह कमी आहे, अशा जमिनीत पेरणीवेळी ८ किलो प्रति एकरी फेरस सल्फेट द्यावे. उभ्या पिकामध्ये लोहाची कमतरता दिसून आल्यास, १ किलो प्रति एकर प्रमाणे फेरस सल्फेटची फवारणी करावी.
👉जस्त - जस्त कमी असलेल्या जमिनीत ८ किलो प्रति एकरी झिंक सल्फेट पेरणीवेळी द्यावे. उभ्या पिकामध्ये जस्ताची कमतरता आढळल्यास, १ किलो प्रति एकर प्रमाणे झिंक सल्फेट फवारणीद्वारे द्यावे.
👉बोरॉन – २ किलो बोरॉन प्रति एकरी पेरणीवेळी द्यावे किंवा उभ्या पिकामध्ये ०.१ टक्का द्रावणाची (१ ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी.