कांदा-लसूण | दोन पाखी साठवणगृह |

कांदा-लसूण

🧅 दोन पाखी साठवणगृह 


👉 या साठवणगृहाची रचना पूर्व-पश्चिम करावी. साठवणगृहाची लांबी ३०-५० फूट असावी. 

👉साठवणगृह दोन पाखी असावे. एका पाखीची रुंदी ४ फूट तर साठवणगृहाची रुंदी १२ फूट असावी. दोन पाख्यांच्यामध्ये वावरण्यासाठी ४ फूट मोकळी जागा ठेवावी. जमिनीपासून तळाची उंची २ फूट ठेवावी. तळ व बाजू लाकडी पट्ट्याने किंवा बांबूने बनवाव्यात. दोन पट्ट्यांमध्ये लहान कांदे पडणार नाहीत इतकी १-१.५ इंच मोकळी जागा ठेवावी. 

👉साठवणगृहाचे छप्पर ॲसबेसटॉसचे असावे. छपराचे पत्रे बाजूच्या भिंतीच्या ३ फूट पुढे आलेले असावेत. छताचा कोन २२ अंश इतका असावा. 

👉साठवणगृहाची मध्यावरील उंची अधांतरी तळापासून ८ फूट तर बाजूची उंची ६ फूट असावी. कांदा भरण्यासाठी व बाहेर काढण्यासाठी प्रत्येक कप्प्याला झडपा असाव्यात. 

👉पाखीमध्ये कांदा भरल्यानंतर त्याच्यावर किमान दोन फूटाची मोकळी जागा ठेवावी. 

👉साठवणगृहाच्या मागील बाजूवरील त्रिकोणी भागातून व दरवाजामधून पाऊस आत जावू नये, यासाठी पत्र्याचा भाग पुढील बाजूने वाढवावा किंवा त्याजागी हिरव्या शेडनेटची जाळी बसवावी. 

तपशील दोन पाखी साठवणगृह 

साठवणक्षमता (टन) २५ ५० 

चाळ उभारणीची दिशा पूर्व-पश्चिम पूर्व-पश्चिम 

लांबीxरुंदीxबाजूची उंचीxमधील उंची (फूट) ४०x१२x६x१० ८०x१२x६x१० 

मधील मोकळ्या जागेची रुंदी (फूट) ४ ४ 

तळाची जमिनीपासूनची उंची (फूट) २ २ 

साठवणक्षमता (घनमीटर) ४२ ८४ 

चाळीचे अपेक्षित आयुष्य  २० २०

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post